अभ्यंग आणि प्रतिकारक्षमता Abhyang, Massage And Immunity
आज आपण पाहत असलेल्या जीवाणू, विषाणू (कोरोना corona / covid-19 इ) व मानव यांच्या युद्धात तैल अभ्यंगाने मानवी शरीराचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
आपण बघितले असेल तर तेलामध्ये कधीच जीवाणू, विषाणू, बुरशी, किडे इ तयार होत नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण शरीरावर तेल लावतो तेव्हा शरीरावर कोणताही जंतू (Bacteria) जगू शकत नाही, डास सुद्धा बसत नाहीत.
मंदिरामध्ये अनेक निरोगी तसेच रोगी लोक येऊन जातात परंतु गाभाऱ्यात तासनतास बसून राहण्याऱ्या पुजाऱ्याला मात्र कुठलाही संसर्ग झालेला आढळत नाही कारण तेथे निरंतर तेलाचा दिवा चालू असतो.
जुन्या काळी वाड्यांमध्ये, घरांमध्ये जी बांधकामे लाकडांची असत त्यांमध्ये दोन चार वर्षांनी लाकडांना तेल लावले जात असे, कारण त्या लाकडांचे जीवजंतू – कीड यांच्यापासून संरक्षण व्हावे आणि त्या जंतूंपासून घरातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून हा उपाय केला जात असे.
पूर्वी लोणचे भरपूर दिवस टिकावे म्हणून त्यावर तेलाचा तवंग, थर ठेवला जायचा, त्यामुळे ते भरपूर दिवस टिकून राहायचे. म्हणून लोणचे सदृश एखादा पदार्थ कोणत्याही preservative शिवाय टिकवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.
पूर्वी राम आणि लक्ष्मण यांना वनवासाला जाताना निरोप द्यायला गेलेल्या भरताला परत येईपर्यंत दशरथ महाराजांचे मृत शरीर हे तेलाच्या द्रोणीत संरक्षित करून ठेवण्यात आले होते. म्हणजे तेलाचा preservative हा गुण आपल्याला हजारो वर्षांपूर्वी माहित होता.
आपण अनुभव घेतला असेल कि एखादी मिरची जाळली असता पसरणारा ठसका किंवा भाजी करताना / एखादा पदार्थ भाजताना पसरणारा वास इ नुसार कुठलीही गोष्ट जाळताना विशिष्ट वायू gas तयार होतो आणि त्या त्या वायूचे परिणामही वेगवेगळे दिसतात. तसेच तेलाचा दिवा घरात जळताना त्याचे सूक्ष्म कण हवेत मिसळतात आणि घरातील वातावरणात पसरून घरातील वातावरण शुद्ध करण्यास मदत करतात.
म्हणून तेलाच्या जन्तुविरोधी गुणधर्माचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे.
अभ्यंग म्हणजे काय ?
सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल अथवा आपल्या वैद्याने सुचवलेले आपापल्या प्रकृतीनुसारचे एखादे औषधी तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात.
अभ्यंग कोणी करावा ?
आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्यधिक प्रवास करणाऱ्यांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणाऱ्यांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणाऱ्यांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणाऱ्यांनी, आणि आरोग्य टिकविण्यासाठी सर्वांनीच नित्य प्रतिदिन अभ्यंग करावा. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणाऱ्यांनी आवर्जुन घ्यायला हवा.
“शिरः श्रवण पादेषु तं विशेषेण शीलयेत |” – विशेषकरून अभ्यंग हा डोके, कान व पाय यांना जरूर करावा.
अभ्यंग कोणी करू नये ?
ज्यांना अजीर्ण, अपचन झाले आहे , ज्यांनी आताच जेवण केले आहे, ज्यांना ताप आहे, शरीरात आम तयार झाला आहे , उलटी आणि जुलाबानंतर अभ्यंग करू नये.
अभ्यंगाची पद्धत –
तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ करावी. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
अभ्यंगासाठी कोणते औषध वापरावे ?
तिळाचे तेल Seasame oil
खोबऱ्याचे तेल coconut oil
औषधीसिद्ध अभ्यंग तेल (आपल्या जवळच्या आयुर्वेदीक डॉक्टर कडून आपल्याला मिळू शकते)
नारायण तेल , महानारायण तेल
वातहर तेले , वातघ्न तेल……. इ अनेक तेले
अभ्यंगाचे फायदे कोणते ? –
लेखामध्ये वर वर्णन केल्याप्रमाणे शरीरावर (त्वचेच्या रंध्रांमध्ये) जर तेलाचा स्तर असेल तर जंतू त्वचेवर जास्त जगू शकत नाही किंवा त्या lipid मध्ये फसून जातो आणि बाहेरून घरी आल्यानंतर पाण्याने तो धुवून टाकल्यास तो लवकर शरीरापासून वेगळा होऊ शकतो.
शारीरिक थकवा, वात कमी होऊन शारीरिक ताकद टिकून राहिल्यामुळे शरीर व्याधी प्रतिकारक्षम बनते.
अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते,
त्वचेचा टोन सुधारतो,
त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.
त्वचेवरील लव कमी होते.
नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते.
@ डॉ आनंद कुलकर्णी MD Ayurved
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594 / 8779584840
Ayurvedic Medicinal Abhyang Oil is available at Amruta Ayurved, Thane. Book Your order now on whatsapp – 9869105594
Visit Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594
For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center, Contact for Appointment – 9869105594
All Type of Ayurveda treatments, Panchakarma, Massage, Steam, Shirodhara are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –