Sunday, 31 May 2020

षडंगोदक (Shadangodak) आणि ज्वर (Fever), ताप आणि प्रतिकारक्षमता (Immunity)

षडंगोदक (Shadangodak) आणि ज्वर (Fever), ताप आणि प्रतिकारक्षमता (Immunity)
षड म्हणजे सहा, अंग म्हणजे घटक आणि उदक म्हणजे पाणी असे सहा द्रव्यांनी बनलेले औषधी पाणी म्हणजे षडंगोदक होय.
औषधी पाणी ? हे काय वेगळे आहे असे तुम्ही म्हणाल पण हि खूप जुनी Concept आहे. जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे आता याही गोष्टीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. आता आयुर्वेद restaurants मध्ये अशा Health Drinks चा प्रचार होऊ लागला आहे. आणि आपल्याला तर ठाऊक आहेच कि भारताआधी पाश्चात्य देश हे मुळ भारतीय असलेल्या आयुर्वेदाचा पुरेपूर वापर करून घेत आहेत.
आजार असताना किंवा आजार नसतानाही एखाद्या औषधाने पाणी सिद्ध करून त्याचा वापर आपल्या स्वास्थ्यासाठी करून घेणे हि संकल्पनाच मुळी शरीराला अगदी जवळची आणि सहज सात्म्य, easily absorb होऊ शकणारी अशी आहे. त्यातच इतर कुठल्याही द्रव पदार्थापेक्षा पाण्यामध्ये जास्ती असलेला गुणधर्म म्हणजे त्याची इतर घटकांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता. Water, which not only dissolves many compounds but also dissolves more substances than any other liquid, is considered the universal solvent. Water would be the quickest across the body membranes due to the highest osmotic difference and absorbs fastest than any other liquid. म्हणूनच या साध्या सोप्या औषधीचा वापर आपण वेळीच करून घेतला पाहिजे.
Shadangodak is famous Ayurvedic medicinal drink widely used by Ayurvedic Vaidyas. The combination of ingredients serves the best results in Heat related problems. It is useful in burning sensation, thirst, fever and Pittaj problems.
द्रव्य घटक – मुस्ता , पर्पट, उशीर, चंदन, उदीच्य, शुण्ठी
षडंगोदक कसे बनवावे
आपण काढा करतो त्याप्रमाणे औषधी द्रव्य घेऊन त्याच्या सोळा पट पाणी घेऊन अग्नीवर हे मिश्रण अर्धे किंवा पाव किंवा पाउण आटवावे आणि नंतर गाळून घ्यावे. आणि दिवसभरात थोडे थोडे प्यावे.
षडंगोदक घेण्याचे प्रमाण
काढा आपण एका वेळी 20 ml ते 80 ml इतका घेऊ शकतो. ( कृपया आवश्यकतेच्या वेळी प्रमाण इ साठी तज्ञ आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला घ्यावा )
षडंगोदक घेण्याचे फायदे
  • ज्वर , ताप कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तापाशी लढण्याची प्रतिकारक्षमता वाढते.
  • शरीरातील उष्णता कमी करते. जळजळ, आगआग कमी करते.
  • अतिरिक्त तहान कमी करते.
  • पित्ताच्या तक्रारींमध्ये वापर करता येतो.
@ डॉ आनंद कुलकर्णी MD Ayurved
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594 / 8779584840
Ayurvedic Shadangodak is available at Amruta AyurvedThane. Book Your order now on whatsapp – 9869105594
Visit Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594

For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center, Contact for Appointment – 9869105594

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma, Massage, Steam, Shirodhara are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Friday, 29 May 2020

अभ्यंग आणि प्रतिकारक्षमता Abhyang, Massage And Immunity

अभ्यंग आणि प्रतिकारक्षमता Abhyang, Massage And Immunity
आज आपण पाहत असलेल्या जीवाणू, विषाणू (कोरोना corona / covid-19 इ) व मानव यांच्या युद्धात तैल अभ्यंगाने मानवी शरीराचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
आपण बघितले असेल तर तेलामध्ये कधीच जीवाणू, विषाणू, बुरशी, किडे इ तयार होत नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण शरीरावर तेल लावतो तेव्हा शरीरावर कोणताही जंतू (Bacteria) जगू शकत नाही, डास सुद्धा बसत नाहीत.
मंदिरामध्ये अनेक निरोगी तसेच रोगी लोक येऊन जातात परंतु गाभाऱ्यात तासनतास बसून राहण्याऱ्या पुजाऱ्याला मात्र कुठलाही संसर्ग झालेला आढळत नाही कारण तेथे निरंतर तेलाचा दिवा चालू असतो.
जुन्या काळी वाड्यांमध्ये, घरांमध्ये जी बांधकामे लाकडांची असत त्यांमध्ये दोन चार वर्षांनी लाकडांना तेल लावले जात असे, कारण त्या लाकडांचे जीवजंतू – कीड यांच्यापासून संरक्षण व्हावे आणि त्या जंतूंपासून घरातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून हा उपाय केला जात असे.
पूर्वी लोणचे भरपूर दिवस टिकावे म्हणून त्यावर तेलाचा तवंग, थर ठेवला जायचा, त्यामुळे ते भरपूर दिवस टिकून राहायचे. म्हणून लोणचे सदृश एखादा पदार्थ कोणत्याही preservative शिवाय टिकवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.
पूर्वी राम आणि लक्ष्मण यांना वनवासाला जाताना निरोप द्यायला गेलेल्या भरताला परत येईपर्यंत दशरथ महाराजांचे मृत शरीर हे तेलाच्या द्रोणीत संरक्षित करून ठेवण्यात आले होते. म्हणजे तेलाचा preservative हा गुण आपल्याला हजारो वर्षांपूर्वी माहित होता.
आपण अनुभव घेतला असेल कि एखादी मिरची जाळली असता पसरणारा ठसका किंवा भाजी करताना / एखादा पदार्थ भाजताना पसरणारा वास इ नुसार कुठलीही गोष्ट जाळताना विशिष्ट वायू gas तयार होतो आणि त्या त्या वायूचे परिणामही वेगवेगळे दिसतात. तसेच तेलाचा दिवा घरात जळताना त्याचे सूक्ष्म कण हवेत मिसळतात आणि घरातील वातावरणात पसरून घरातील वातावरण शुद्ध करण्यास मदत करतात.
म्हणून तेलाच्या जन्तुविरोधी गुणधर्माचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे.
अभ्यंग म्हणजे काय ?
सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल अथवा आपल्या वैद्याने सुचवलेले आपापल्या प्रकृतीनुसारचे एखादे औषधी तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात.
अभ्यंग कोणी करावा ?
आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्यधिक प्रवास करणाऱ्यांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणाऱ्यांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणाऱ्यांनी, बौध्दिक शारिरिक परिश्रम करणाऱ्यांनी, आणि आरोग्य टिकविण्यासाठी सर्वांनीच नित्य प्रतिदिन अभ्यंग करावा. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणाऱ्यांनी आवर्जुन घ्यायला हवा.
“शिरः श्रवण पादेषु तं विशेषेण शीलयेत |” – विशेषकरून अभ्यंग हा डोके, कान व पाय यांना जरूर करावा.
अभ्यंग कोणी करू नये ?
ज्यांना अजीर्ण, अपचन झाले आहे , ज्यांनी आताच जेवण केले आहे, ज्यांना ताप आहे, शरीरात आम तयार झाला आहे , उलटी आणि जुलाबानंतर अभ्यंग करू नये.
अभ्यंगाची पद्धत –
तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे. अभ्यंग विषेशतः सकाळी आंघोळ आणि व्यायाम करण्यापुर्वी करावा. अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ करावी. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
अभ्यंगासाठी कोणते औषध वापरावे ?
तिळाचे तेल Seasame oil
खोबऱ्याचे तेल coconut oil
औषधीसिद्ध अभ्यंग तेल (आपल्या जवळच्या आयुर्वेदीक डॉक्टर कडून आपल्याला मिळू शकते)
नारायण तेल , महानारायण तेल
वातहर तेले , वातघ्न तेल……. इ अनेक तेले
अभ्यंगाचे फायदे कोणते ? –
लेखामध्ये वर वर्णन केल्याप्रमाणे शरीरावर (त्वचेच्या रंध्रांमध्ये) जर तेलाचा स्तर असेल तर जंतू त्वचेवर जास्त जगू शकत नाही किंवा त्या lipid मध्ये फसून जातो आणि बाहेरून घरी आल्यानंतर पाण्याने तो धुवून टाकल्यास तो लवकर शरीरापासून वेगळा होऊ शकतो.
शारीरिक थकवा, वात कमी होऊन शारीरिक ताकद टिकून राहिल्यामुळे शरीर व्याधी प्रतिकारक्षम बनते.
अभ्यंगा नंतर शरीरास उटणे चोळुन आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते,
त्वचेचा टोन सुधारतो,
त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.
त्वचेवरील लव कमी होते.
नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते.
@ डॉ आनंद कुलकर्णी MD Ayurved
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594 / 8779584840
Ayurvedic Medicinal Abhyang Oil is available at Amruta AyurvedThane. Book Your order now on whatsapp – 9869105594

Visit Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594

For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center, Contact for Appointment – 9869105594

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma, Massage, Steam, Shirodhara are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Tuesday, 26 May 2020

आयुर्वेदिक धूपन चिकित्सा Dhoopan Ayurvedic Fumigation, Smudging

आयुर्वेदिक धूपन चिकित्सा Dhoopan Ayurvedic Fumigation, Smudging
आयुर्वेदिक धूपन चिकित्सा म्हणजे आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा धूर करणे अथवा देणे होय. धूपन (धुरी) हि फार पूर्वीपासून चालत आलेली अशी पद्धत आहे. केरळ, गोवा या राज्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीत या धूपन पद्धतीचा वापर केल्यामुळे ही साथ नियंत्रणात यायला खूप मदत झाली आहे. साधारणपणे लोकांना आठवत असेल कि धुरी हि बाळान्तपणात तसेच लहान बालकांना दिली जायची किंवा काही ठिकाणी अजूनही दिली जाते. याच धूपनाचा वापर कपड्यांना, वेगवेगळ्या भांड्यांना, घरांना, खोल्यांना (Rooms), घरगुती वस्तूंना निर्जंतुक करण्यासाठी केला जातो. सगळ्यात स्वस्त आणी निर्धोक (कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय) असा निर्जन्तुकीकरणाचा मार्ग म्हणजे धूपन होय. आरतीप्रमाणे धूपनाचा धूर हा आपल्या हाताने नाकात, कानात, तोंडातही घ्यावा म्हणजे शरीरात आत प्रवेश होऊ शकणारी हि सप्त म्हणजे सात छिद्रे निर्जंतुक होण्यास मदत होते.
अमेरिकेत सुद्धा धूपनाचा वापर पारंपारिक पद्धतीने केला जातो त्याला smudging स्मजिंग असे म्हणतात. Smudging - way to create a cleansing smoke bath that is used to purify the body, aura, energy, ceremonial/ritual space or any other space and personal articles. The smudging ceremony is a Native American tradition that cleanses bad feelings and negative spirits from houses. Smudging is done by burning specific dried herbs and letting the smoke float around the house.
धूप साहित्य – (आपण घरी खालीलपैकी जी कोणती औषधी वस्तू उपलब्ध असेल तिचा वापर धूपनासाठी करू शकतो)
शेणाच्या गोवऱ्या, कापूस, कापसाच्या वाती, कापूर, तिळाचे तेल, गाईचे तूप, अक्षता तांदूळ, तुळशीची पाने, कडूनिम्बाची पाने, आंब्याची पाने, विविध प्रकारची वाळलेली फुले, झेंडूची फुले, निशिगंधाची फुले, ओवा, हळद, मीठ, मोहरी, विडंग, त्रिफळा, बाळन्तशेपा, हिंग, वेखंड, शुण्ठी, अगरु, शाल, राळ इत्यादी अनेक औषधी आपण धूपनासाठी वापरू शकतो. यापैकी एक, दोन किंवा सर्व जे मिळेल त्याने धूपन केले तरी चालते. हेही मिळालेच पाहिजे असा आग्रह नसावा. आयुर्वेदाच्या काश्यप संहिता, चरक, सुश्रुत, वाग्भट नावाच्या ग्रंथांमध्ये तर विविध प्रकारच्या रोगांसाठी, निर्जन्तुकीकरणासाठी, सौंदर्यासाठी, लहान मुलांसाठी अशा अनेक उपायांसाठी विविध प्रकारचे धूपन सांगितले आहे.
धूपन कसे करायचे – कोणत्याही प्रकारच्या अग्निवरती वरील पैकी द्रव्य टाकल्यास जो धूर तयार होतो तो हव्या असलेल्या ठिकाणी फिरवायचा.
किंवा आवश्यकतेनुसार एक गोवरीचा तुकडा घेवून त्यावर वात पेटवून किंवा कापूर पेटवून अग्नी प्रज्वलित करावा. नंतर विस्तव तयार झाला कि त्यावर धूप द्रव्ये टाकावीत व घरामध्ये सगळीकडे फिरवावा. 
धूपनाचे फायदे –
  • निर्जंतुकीकरण Disinfection Sterilization
  • पेस्ट कंट्रोल किडे कीटक यांना दूर ठेवते Control pests, rodents, insects etc
  • साथीच्या रोगांना नियंत्रित करते Prevent Outbreak of Epidemics
  • सर्दी, खोकला, ताप, त्वचा विकार, अपस्मार, फिट, जखमा, सूज यांना कमी करते Effective in Cold, Cough, Fever, Skin diseases, Epilepsy, Ulcers, Inflammation
@ डॉ. आनंद कुलकर्णी MD Ayurved
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594
Ayurvedic Dhoopan Treatment and material is available at Amruta AyurvedThane. Book Your order now on whatsapp - 9869105594

Visit Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594

For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact for Appointment – 9869105594

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma, Massage, Steam, Shirodhara are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Sunday, 24 May 2020

नस्य आयुर्वेदिक पंचकर्म घर पर कर सकते है ऐसा पंचकर्म

नस्य आयुर्वेदिक पंचकर्म
नस्य का अर्थ -
      ‘दवाई नाक में डालना’ इसे नस्य कहते है | आयुर्वेद में ‘नासा ही शिरसो द्वारम्’ याने शिर का द्वार नासा (नाक) है, ऐसा कहा है | इसलिए नाक, कान, मुह, सिर और दिमाग इनकी बीमारियों में नाक से दी जानेवाली दवाईया तुरंत असर करती है |
नस्य कैसे करते है ? –
      पहले अपने बेड पर पीठ के बल सो जाना है, कंधो के निचे छोटा तकिया लेना है और सर को ऐसे निचे करना है की कपाल निचे, ठोड़ी (चिन) और  नाक थोडीसी ऊपर आ जाये, जैसे चित्र में दिखाया गया है | दवाई नाक में डालकर सौ गिनने तक वैसेही रुकना है |
कितनी दवाई डालनी है ?–
      नस्य यह एक आयुर्वेदीय पंचकर्म है | अगर कोई बिमारि के लिये कर रहे हो तो वैद्य की सलाह लेना जरुरी है | वैद्य अपनी चिकित्सालय में उसकी बुँदे रोग अनुसार ठहराते है | परन्तु अगर आप निरोगी हो और स्वास्थ्य के लिए (व्याधी प्रतिबन्ध के लिए, प्रतिकार शक्ति बढाने के लिए ) घर पर करना चाहते हो तो, दो बूंद की मात्रा में दोनों नाक में दवाई डालनी है |
नाक में कौन सी दवाई डालनी है ? –
      सामान्यतः नाक मे घर पर डालने के लिए तिल का तेल या गाय का घी इस्तेमाल कर सकते है | यातो अपने अपने आयुर्वेद वैद्य की सलाह से जैसी व्याधि अवस्था हो वैसे अलग अलग दवाई आप डाल सकते हो |  
नस्य के फायदे –
      नाक मे फॅट का स्तर (बायलिपिड लेअर) रहता है तो जीवाणु विषाणु उसमे फस जाते है और वही मर जाते है |
नस्य से नाक मे सिलियरी बिटिंग Ciliary Biting बढता है और विजातीय द्रव्य श्वसनवह संस्थान से बाहर फेक देने में मदत होती है |
नाक, मुह, कान, आँख के रोग नहीं होते |
याददाश अच्छी रहती है |
नींद अच्छी आती है
सर्दी, खासी, Sinus ( सायनस), अनेक प्रकार के इन्फेक्शन इत्यादि में नस्य बहोत लाभदायी होता है |
डॉ. आनंद कुलकर्णी
अमृता आयुर्वेद, हरिनिवास,
नौपाडा, ठाणे प
९८६९१०५५९४
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर      A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594

Please visit to Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Friday, 15 May 2020

प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ? Part 1 How to boost Immunity ?

प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ?
कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करायला आपल्या कडे येवढी ताकद हवी कि जेणेकरून आपण त्या संकटाला किंवा प्रसंगाला सामोरे जाऊन त्याचा नायनाट करता यायला हवा. त्यासाठी आपण तेवढे सक्षम असले पाहिजे. मग आता या सक्षमीकरणासाठी आपण काय काय केले पाहिजे, तर समोरील संकटाला ओळखून आपल्याकडे त्याच्याविरोधात लढण्यासाठी पुरेसे बळ पाहिजे. उदाहरणार्थ – शत्रू बंदूक घेऊन मारायला आला तर आपल्याकडे किमान बंदूक तरी हवी, आणखी सक्षम राहण्यासाठी आपल्याकडे तोफा, बॉम्ब, स्वसंरक्षण यंत्रणा, रडार, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी हव्यात, ज्यामुळे आपण शत्रूचा पूर्ण नायनाट करून त्यावर विजय मिळवू शकू.
आरोग्याच्या बाबतीतहि तसेच आहे. आपण जेवढे सक्षम राहणार तेवढी रोगांशी लढण्याची ताकद जास्त असणार.
यामध्ये पहिल्यांदा आपण स्वस्थ असले पाहिजे. नंतर पुढे इतर जास्तीची सामग्री गोळा केली पाहिजे. ज्याला आपण येक्ष्ट्रा इम्युनिटी ( Extra Immunity ) असे म्हणू शकतो. युद्धात जास्तीची सामग्री गोळा करून ठेवली तर नुकसान तर नक्कीच होणार नाही उलट आयत्यावेळी शत्रूला टक्कर देण्यासाठी आपण समर्थ राहू शकतो.
तसेच रोगांशी लढताना प्रथम आपण स्वस्थ असले पाहिजे त्याबरोबरच इतर आजार होऊ नये म्हणून लसीकरण करून घेणे, चांगल्या औषधी घेणे ( जसे आधुनिक वैद्यक शास्त्रात Antibiotic, Antiviral medicines इ मेडिसिन्स रोग होऊ नये म्हणून, तसेच रोग झाल्यावर सुद्धा दिली जातात.), चांगला आहार ठेवणे, योग्य व्यायाम करणे इत्यादी अनेक विध बाजूंनी आपण सज्ज राहतो.
त्याप्रमाणेच आयुर्वेदाने सुद्धा रोगप्रतिकारक्षमता चांगली राहण्यासाठी म्हणून अनेक उपाय सांगून ठेवले आहेत. त्यालाच रोग अनुत्पादनीय ( रोग उत्पादन होऊ नये म्हणून) असे म्हटले जाते.
‘रोग होउच नये म्हणून’ – किती छान विचार आहे. रोग झालाच नाही तर – डॉक्टर कडे जावे लागणार नाही, त्याचा औषधोपचार घ्यावा लागणार नाही, त्यासाठी जाणेयेणे नाही, मानसिक ताण नाही इ सुखे आपल्या पदरात पडतील.