Tuesday, 26 May 2020

आयुर्वेदिक धूपन चिकित्सा Dhoopan Ayurvedic Fumigation, Smudging

आयुर्वेदिक धूपन चिकित्सा Dhoopan Ayurvedic Fumigation, Smudging
आयुर्वेदिक धूपन चिकित्सा म्हणजे आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा धूर करणे अथवा देणे होय. धूपन (धुरी) हि फार पूर्वीपासून चालत आलेली अशी पद्धत आहे. केरळ, गोवा या राज्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीत या धूपन पद्धतीचा वापर केल्यामुळे ही साथ नियंत्रणात यायला खूप मदत झाली आहे. साधारणपणे लोकांना आठवत असेल कि धुरी हि बाळान्तपणात तसेच लहान बालकांना दिली जायची किंवा काही ठिकाणी अजूनही दिली जाते. याच धूपनाचा वापर कपड्यांना, वेगवेगळ्या भांड्यांना, घरांना, खोल्यांना (Rooms), घरगुती वस्तूंना निर्जंतुक करण्यासाठी केला जातो. सगळ्यात स्वस्त आणी निर्धोक (कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय) असा निर्जन्तुकीकरणाचा मार्ग म्हणजे धूपन होय. आरतीप्रमाणे धूपनाचा धूर हा आपल्या हाताने नाकात, कानात, तोंडातही घ्यावा म्हणजे शरीरात आत प्रवेश होऊ शकणारी हि सप्त म्हणजे सात छिद्रे निर्जंतुक होण्यास मदत होते.
अमेरिकेत सुद्धा धूपनाचा वापर पारंपारिक पद्धतीने केला जातो त्याला smudging स्मजिंग असे म्हणतात. Smudging - way to create a cleansing smoke bath that is used to purify the body, aura, energy, ceremonial/ritual space or any other space and personal articles. The smudging ceremony is a Native American tradition that cleanses bad feelings and negative spirits from houses. Smudging is done by burning specific dried herbs and letting the smoke float around the house.
धूप साहित्य – (आपण घरी खालीलपैकी जी कोणती औषधी वस्तू उपलब्ध असेल तिचा वापर धूपनासाठी करू शकतो)
शेणाच्या गोवऱ्या, कापूस, कापसाच्या वाती, कापूर, तिळाचे तेल, गाईचे तूप, अक्षता तांदूळ, तुळशीची पाने, कडूनिम्बाची पाने, आंब्याची पाने, विविध प्रकारची वाळलेली फुले, झेंडूची फुले, निशिगंधाची फुले, ओवा, हळद, मीठ, मोहरी, विडंग, त्रिफळा, बाळन्तशेपा, हिंग, वेखंड, शुण्ठी, अगरु, शाल, राळ इत्यादी अनेक औषधी आपण धूपनासाठी वापरू शकतो. यापैकी एक, दोन किंवा सर्व जे मिळेल त्याने धूपन केले तरी चालते. हेही मिळालेच पाहिजे असा आग्रह नसावा. आयुर्वेदाच्या काश्यप संहिता, चरक, सुश्रुत, वाग्भट नावाच्या ग्रंथांमध्ये तर विविध प्रकारच्या रोगांसाठी, निर्जन्तुकीकरणासाठी, सौंदर्यासाठी, लहान मुलांसाठी अशा अनेक उपायांसाठी विविध प्रकारचे धूपन सांगितले आहे.
धूपन कसे करायचे – कोणत्याही प्रकारच्या अग्निवरती वरील पैकी द्रव्य टाकल्यास जो धूर तयार होतो तो हव्या असलेल्या ठिकाणी फिरवायचा.
किंवा आवश्यकतेनुसार एक गोवरीचा तुकडा घेवून त्यावर वात पेटवून किंवा कापूर पेटवून अग्नी प्रज्वलित करावा. नंतर विस्तव तयार झाला कि त्यावर धूप द्रव्ये टाकावीत व घरामध्ये सगळीकडे फिरवावा. 
धूपनाचे फायदे –
  • निर्जंतुकीकरण Disinfection Sterilization
  • पेस्ट कंट्रोल किडे कीटक यांना दूर ठेवते Control pests, rodents, insects etc
  • साथीच्या रोगांना नियंत्रित करते Prevent Outbreak of Epidemics
  • सर्दी, खोकला, ताप, त्वचा विकार, अपस्मार, फिट, जखमा, सूज यांना कमी करते Effective in Cold, Cough, Fever, Skin diseases, Epilepsy, Ulcers, Inflammation
@ डॉ. आनंद कुलकर्णी MD Ayurved
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594
Ayurvedic Dhoopan Treatment and material is available at Amruta AyurvedThane. Book Your order now on whatsapp - 9869105594

Visit Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594

For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact for Appointment – 9869105594

All Type of  Ayurveda treatments, Panchakarma, Massage, Steam, Shirodhara are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

No comments:

Post a Comment