Monday 30 January 2017

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 2

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 2

स्वरूप / लक्षणे –
  • ताप / तापासारखे – अंग गरम वाटणे, ( कधी कधी अशी माणसे बघायला मिळतात कि त्यांचे अंग स्पर्शास गरम लागते. )
  • कणकण – अंग कसकसत राहते, खूप श्रमाने किंवा आजारीपणाने म्हणा शरीरात उष्णता मुरून राहिलेली असते, बारीक ताप वाटतो हेही उष्णतेतेच उदाहरण नाही का ?
  • उन्हाळी – मुत्रप्रवृत्तीस गरम , उष्ण होणे,
  • आग / दाह – हातापायांची आग, हृदयात आग / जळजळ, डोळ्यांची आग, अंगाची लाही लाही होणे, इत्यादी उष्णताच होय.
  • घामोळ्या – उन्हाळा किवा गरमी किंवा गरम वातावरणात काम केल्यामुळे जास्ती घाम येतो. तो घाम स्वच्छ न झाल्यास उष्णता बाहेर टाकण्यासाठीची घर्मरंध्रे बंद होऊन त्वचेवर पुळ्या येतात त्या उष्णतेमुळेच होय.
  • लाली येणे – डोळे लाल होणे, त्वचा लाल होणे, किंवा कुठलाही अवयव लाल होणे म्हणजे त्या त्वचेखाली रक्ताचा संचार वाढतो, तो प्रसरण पावतो हेही उष्णतेमुळेच
  • त्वचेवर फोड येणे.
  • त्वचा कालवंडणे
  • मुरूम ( तारुण्यपिटिका )
  • रक्तस्राव – नाकातून, कानातून, गुदमार्गातून, मूत्रमार्गातून रक्तस्राव होणे, तसेच मेंदूत रक्तस्राव, त्वचेखाली किंवा एखाद्या अंतर्गत अवयवात रक्तस्राव होतो तो रक्तातील उष्णता वाढते, पित्त वाढते व पित्तास लाली प्राप्त होऊन रक्तास पातळपणा येतो, उष्णतेमुळे रक्तवाहिन्या प्रसारण पावतात, प्रसंगी फुटतात.व रक्तस्राव झालेला दिसतो. उष्णतेस / पित्तास कफ वा वाताची कोणाचीही जोड मिळते त्यावर रक्तस्राव कुठे होतो हे ठरत असते.
  • कावीळ – ही तर जगन्मान्य अशी उष्णतेमुळेच होणारी व्याधी आहे. शरीरातील पित्ताचा प्रकोप होऊन निर्माण झालेली ही अवस्था होय. ही सुद्धा उष्णताजन्यच होय. किंवा उष्णतेच्या विकृतीचीच जाणीव करून देणारी होय.
  • नागीण – ही सुद्धा समाजात उष्णताजन्यच समजली जाते. शरीरातील त्या भागातील चेतातंतूच्या टोकानाच नष्ट करणारी व प्रसंगी प्राणघातक अशी ही व्याधी पित्त, उष्मा याच्याच विकृतीची परिणती आहे.
  • तोंड येणे – नेहमीच्या जीवनातील, कोणाकोणाची तर दररोजची ही तक्रार त्या व्यक्तीला हैराण करून टाकते. धड कुठलीच चव घेता येत नाही. हवे तसे खाता येत नाही. ( परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी स्वताच्याच चुकांमुळे या त्रासाला सामोरे जावे लागते हा नेहमीचा अनुभव आहे. ) जर आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्याछोट्या गोष्टींमध्ये केली, मनाची सात्विक वृत्ती ठेवली तर या व्याधीवर नक्कीच मात करता येते.
  • तृष्णा – ( तहान लागणे ) – सतत तहान लागणे, सतत पाणी प्यावेसे वाटणे, सतत तोंडाला कोरड पडणे हे सुद्धा शरीरातील उष्णतेची वाढ झालेले व पाण्याची किंवा स्नेहाची कमतरता झालेले असे उदाहरण आहे.
  • हातापायांच्या तळव्यांना घाम येणे – काहीकाहींना हा घाम इतका प्रचंड प्रमाणात असतो कि दिवसभरात अनेक रुमाल अगदी ओलेचिंब होऊन जातात. शरीरांतर्गत पित्ताची विकृती झाल्याने ( अर्थातच उष्णतेची विकृती झाल्याने ) हे लक्षण उद्भवते.
For more……9869105594 , http://amrutaayurved.in/
For more ………
Old articles  available
please see the articles on www.amrutaayurved.in
 
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –