Friday 15 May 2020

प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ? Part 1 How to boost Immunity ?

प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ?
कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार करायला आपल्या कडे येवढी ताकद हवी कि जेणेकरून आपण त्या संकटाला किंवा प्रसंगाला सामोरे जाऊन त्याचा नायनाट करता यायला हवा. त्यासाठी आपण तेवढे सक्षम असले पाहिजे. मग आता या सक्षमीकरणासाठी आपण काय काय केले पाहिजे, तर समोरील संकटाला ओळखून आपल्याकडे त्याच्याविरोधात लढण्यासाठी पुरेसे बळ पाहिजे. उदाहरणार्थ – शत्रू बंदूक घेऊन मारायला आला तर आपल्याकडे किमान बंदूक तरी हवी, आणखी सक्षम राहण्यासाठी आपल्याकडे तोफा, बॉम्ब, स्वसंरक्षण यंत्रणा, रडार, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी हव्यात, ज्यामुळे आपण शत्रूचा पूर्ण नायनाट करून त्यावर विजय मिळवू शकू.
आरोग्याच्या बाबतीतहि तसेच आहे. आपण जेवढे सक्षम राहणार तेवढी रोगांशी लढण्याची ताकद जास्त असणार.
यामध्ये पहिल्यांदा आपण स्वस्थ असले पाहिजे. नंतर पुढे इतर जास्तीची सामग्री गोळा केली पाहिजे. ज्याला आपण येक्ष्ट्रा इम्युनिटी ( Extra Immunity ) असे म्हणू शकतो. युद्धात जास्तीची सामग्री गोळा करून ठेवली तर नुकसान तर नक्कीच होणार नाही उलट आयत्यावेळी शत्रूला टक्कर देण्यासाठी आपण समर्थ राहू शकतो.
तसेच रोगांशी लढताना प्रथम आपण स्वस्थ असले पाहिजे त्याबरोबरच इतर आजार होऊ नये म्हणून लसीकरण करून घेणे, चांगल्या औषधी घेणे ( जसे आधुनिक वैद्यक शास्त्रात Antibiotic, Antiviral medicines इ मेडिसिन्स रोग होऊ नये म्हणून, तसेच रोग झाल्यावर सुद्धा दिली जातात.), चांगला आहार ठेवणे, योग्य व्यायाम करणे इत्यादी अनेक विध बाजूंनी आपण सज्ज राहतो.
त्याप्रमाणेच आयुर्वेदाने सुद्धा रोगप्रतिकारक्षमता चांगली राहण्यासाठी म्हणून अनेक उपाय सांगून ठेवले आहेत. त्यालाच रोग अनुत्पादनीय ( रोग उत्पादन होऊ नये म्हणून) असे म्हटले जाते.
‘रोग होउच नये म्हणून’ – किती छान विचार आहे. रोग झालाच नाही तर – डॉक्टर कडे जावे लागणार नाही, त्याचा औषधोपचार घ्यावा लागणार नाही, त्यासाठी जाणेयेणे नाही, मानसिक ताण नाही इ सुखे आपल्या पदरात पडतील.

No comments:

Post a Comment